उस्मानाबादकरासाठी अत्यावश्यक सेवा घरपोच ....

उस्मानाबादकरासाठी अत्यावश्यक सेवा घरपोच ....


कोरोना व्हायरसचा  संसर्ग होऊ नये म्हणून  21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे 21 दिवस कुणीही घराबाहेर पडू नये.


 दैनंदिन जीवनात लागणा-या अत्यावश्यक वस्तू  घरपोच पुरवण्यासाठी उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने सर्व  भाजी , किराणा, दुध ,फळे विक्रेत्यांची यादी फोन नंबरसह तयार केली आहे व या सर्व व्यापा-यांना पोलीस प्रशासन आपल्या वस्तू पोहच करताना अडवू नये म्हणुन  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या मान्यतेने नगर पालिकेचे ओळखपत्र देण्यात येत आहेत .  सदर यादी मधील व्यापा-यांशी फोनद्वारे संपर्क साधुन आपल्याला लागणा-या जीवनावश्यक वस्तूंची मागणी आपण  घरबसल्या करू शकता.त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना विनंती की , कोणीही  घराबाहेर न पडता नगर परिषदने करून दिलेल्या सोईचा लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. 
सदर यादी पुढील प्रमाणे आहे व ही यादी प्राथमिक स्वरूपात असुन आनखी विक्रेते व व्यापारी नगर पालिकेच्या संपर्कात येत आहेत त्याप्रमाणे नविन यादी आपल्याला कळविण्यात येईल,असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.