कराडला विजय दिवसनिमीत्त भरगच्च कार्यक्रम

कराडला विजय दिवसनिमीत्त भरगच्च कार्यक्रम


कराड: विजय दिवस समारोह यंदाही १४ ते १६ डिसेंबर दरम्यान दिखाखात साजरा केला जाणार आहे. भारतीय सैन्यदलाच्या थरारक कसरती, पुरस्कार वितरण, प्लॅस्टीकमुक्त क-हाड दौड, शोभा यात्रा, शस्त्रास्त्र प्रदर्शन यासह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीच्यावतीने उपाध्यक्ष अरुण जाधव, विष्णू पाटसकर यांनी दिली. भारतीय सैन्यदलाने बांग्लादेश युध्दात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ येथे दरवर्षी निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय दिवस समारोह दिमाखात साजरा केला जातो. यंदाचे हे वर्ष आहे. त्यानिमीत्त १४ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता शोभा यात्रेने विजय दिवसच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यास प्रारंभ होईल. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, जेष्ट नगरसेवक विनायक पावसकर, स्वातंत्र्य सैनिक भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता लिबर्टी मैदानावर शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उदघाटन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ.इंद्रजीत मोहिते, तहसीलदार अमरदीप वाकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे नितीन काशिद, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील यांच्या हस्ते त्याचे उदघाटन होईल. दुपारी १२ वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, लेप्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव उपस्थित राहतील.. प्लॅस्टीकमुक्त कराड दौडीला १५ डिसेंबरला (रविवारी) सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळुन प्रारंभ विद्यार्थ्यांनी दिलेल्या साड्यांपासून होईल. आ.आनंदराव पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, धनलक्ष्मी फाऊंडेशनचे दिलीपराव चव्हाण उपस्थित राहतील. सकाळी साडेनऊ वाजता लिबर्टी मैदानाच्या परिसरात रक्तदान शिबीर होईल. मलकापुर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, डॉ.अनिल शहा, कालिकादेवी कुटुंब प्रमुख मुनीर बागवान, बांधकाम सभापती हणमंत पवार, नगरसेविका श्रीमती शारदा जाधव, एचडीएफसी बँकेचे कौसर बशीर उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात जीवन गौरव यशवंत पुरस्काचे वाळवा एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव बाळासाहेब सदाशिव पाटील उर्फ बी. एस.आण्णा यांना प्रदान करण्यात येईल. यावेळी साड्यांपासून पालिकेने वीरमाता सन्मान कोळे (ता.कराड) येथील श्रीमती सिध्दवा काशिनाथ मुडगे, आदर्शमाता पुरस्कार हणमंतवडीये (ता.कडेगाव) येथील क्रांतीविरांगना हौसाताई भगवानराव पाटील, आदर्श विद्यार्थी पुरस्कार ऐश्वर्या पाटणकर, चारुदत्त करपे यांना रयत शिक्षण संस्थेचे डॉ.अनिल पाटील, खा.श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत गौरवण्यात येईल. अप्पर जिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ उपस्थित राहतील. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने करण्यात आले आहे.