कराड, : प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने कराड नगरपालिकेने कापडी व कागदी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले आहे. या अभियानात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या मुलांनी घरांमधून आणलेल्या साड्यांपासून नगरपालिकेने सुमारे अडीच हजार कापडी पिशव्या बनवल्या आहेत. या पिशव्यांचे वाटप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ग्रीनी द ग्रेट ही पर्यावरणीय जीवनशैलीचा प्रचार करणारी संस्था कराड नगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी मदत करत आहे. या संस्थेने प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले आहे. या संस्थेने गेल्या सहा महिन्यात शहरातील सात प्राथमिक शाळांमध्ये जाऊन घनकचऱ्याचे वर्गीकरण व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली होती. विद्यार्थ्यांना घनकचऱ्याचे वर्गीकरणाचे प्रात्याक्षिक दाखवले होते. तसेच प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करण्यास सांगितले होते. घरातून जुन्या साड्या आणण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांकडून साड्या आणून ग्रीनी संस्थेला दिल्या होत्या. या साड्यांपासून बचत गटाच्या महिलांकडून कापडी पिशव्या बनवून घेण्यात आल्या होत्या.आजपर्यंत २२० साड्या गोळा करण्यात आल्या होत्या. यापासून सुमारे अडीच हजार कापडी पिशव्या बनवण्यात आल्या आहेत. या पिशव्या बनवण्यासाठी जो खर्च आला आहे, तो नगरपालिकेकडून संबंधित महिलांना देण्यात येणार आहे. या पिशव्या साडी देणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी दोन व साडी दिलेल्या कुटुंबास प्रत्येकी दोन या प्रमाणात वाटण्यात आल्या. त्यामुळे प्लास्टिक बंदीबाबतच्या जनजागृतीला यश आले आहे. नगरपालिकेच्या नूतन मराठी शाळेच्या मुलांना या साड्यांचे वाटप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती ___स्मिता हुलवान, पाणी पुरवठा सभापती अर्चना ढेकळे, नगरसेविका शारदा जाधव, आशा मुळे, सुप्रिया खराडे, नगरसेवक किरण पाटील, बाळासाहेब यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, ए. आर. पवार, आर. डी. भालदार आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य सैनिक भाई गंगाराम गुजर महाराज पुतळ्याजवळुन प्रारंभ प्रदान करण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या साड्यांपासून पालिकेने बनवल्या अडीच हजार पिशव्या